शिवाजी महाराजांचे अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात शिवजयंती साजरी.

कणकवली/मयुर ठाकूर.

“छञपती शिवाजी महाराजांनी अत्यंत निष्ठेने व जिद्दीने राज्य चालविले. खंबीर मनोवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण होते. त्यांचें अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत आहे “असे प्रतिपादन येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजर्षी साळुंखे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कणकवली महाविद्यालयात शिवरायांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी डॉ.राजश्री साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसंगी शक्तीने व युक्तीने राज्यकारभार चालविला. उत्तम प्रशासनाची घडी घातली. कल्पक बुद्धीने मजबूत किल्ले उभारले. ” असे मत यावेळी डॉ. राजश्री साळुंखे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सोमनाथ कदम ,कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.हरिभाऊ भिसे, अधिक्षक श्री संजय ठाकूर, डॉ.श्यामराव दिसले, प्रा.सुरेश पाटील, मनोज कांबळे, प्रा. मीनाक्षी सावंत, प्रा. प्रमोद कोरगावकर, प्रा. एस. आर. जाधव, श्री प्रमोद चव्हाण, श्री रविंद्र लाड उपस्थित होते.
यावेळी डॉ. सोमनाथ कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. ते म्हणाले की ” छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्य काळामध्ये न्यायावर आधारित धर्मनिरपेक्ष स्वराज्याची स्थापना केली. सामान्य माणसाला आपले वाटणाऱ्या कल्याणकारी राज्याची निर्मिती हे शिवाजी महाराजांचे विशेष कार्य ठरते”.
या प्रसंगी प्रा. वैशाली पाटील, डॉ. मारोती चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन डॉ. मारोती चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!