आचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लक्ष एवढा निधी मंजूर

निलेश राणे यांची वचनपूर्ती आणि पाठपुरावा
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आचरा येथे खार बंधारा फुटल्याने शेतजमिनीत पाणी घुसून जमिन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. . त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी १७ मे २०२३ रोजी आचरा खारबंधाऱ्यांची पहाणी करून तत्काळ दुरुस्तीच्या सूचना खारभूमी अभियंता श्री. होडावडेकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करत तात्पुरती उपाययोजना श्री. होडावडेकर यांनी केली होती, मात्र याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आचरा ग्रामस्थांकडून निलेश राणे यांच्याजवळ करण्यात आली होती, त्यानुसार या बाबतची निविदा जाहीर झाली असून एकूण ९२ लाख एवढा निधी आचरा खारभूमी येथे खर्ची होणार आहे. . निलेश राणे यांनी आचरा खारभूमी संदर्भात आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल आचरा ग्रामस्थ तसेच भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर व आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ. .