पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथून मोटारीनी देवगडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता देवगड येथे आगमन व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय देवगड या इमारतीच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जुनी दिवाणी न्यायालय देवगड इमारत परिसर, शासकीय गोडाऊन जवळ, पवनचक्की रोड, ता.देवगड जि. सिंधुदुर्ग.दुपारी 2 वाजता केळकर महाविद्यालय, देवगड येथून हेलिकॉप्टर (VT-GHS) ने मिराभाईदर, जि. ठाणेकडे प्रयाण.

error: Content is protected !!