रिगल कॉलेज कणकवलीच्या विध्यार्थ्याची ‘फिनिक्स’आणि एल अँड टी कंपनी मध्ये निवड

रिगल कॉलेज कणकवली येथे सन २०१० पासून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात.आजच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम विध्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता अत्यावश्यक आहेत. रिगल कॉलेजमध्ये बी.सी.ए.,हॉटेल मॅनेजमेंट डिग्री /डीप्लोमा ,सिव्हिल ड्राफ्टसमन ,नर्सिंग केअर, बी.एम.एस असे अभ्यासक्रम सुरु आहेत.
बी.सी.ए अभ्यासक्रमाची २०२२-२३ बॅचची विध्यार्थिनी कु.मुबाशिरा मेमोन हिची पुणे येथील ‘फिनिक्स कंपनी मध्ये ऑपरेशन फ्लोर मॅनेजर पदी निवड झाली आहे. तर सिव्हिल ड्राफ्टसमन अभ्याक्रमाचा २०२२-२३ बॅचचा विध्यार्थी कु.सागर परब याची मुंबई येथील एल अँड टी कंपनी मध्ये निवड झाली आहे. त्यांच्या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.संजयराव शिर्के सर, संचालिका डॉ सुमती शिर्के मॅडमप्राचार्या तृप्ती मोंडकर तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
प्रतिनिधी, कणकवली