श्रमाच्या सवयीचा सुंदर वस्तूपाठ म्हणजेच स्काऊट गाईडची खरी कमाई योजना : दीपकभाई केसरकर

स्काऊट गाईडच्या “कब बुलबुल” च्या शिबिरास मंत्री दीपकभाई केसरकर यांची भेट
बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजन
निलेश जोशी, । कुडाळ : शालेय जीवनापासून मुलांना स्वावलंबनाचे धडे देणारा स्काऊट गाईड हा विभाग महत्त्वाचा विभाग असून कोणतेही काम करताना कमीपणा न आणता काम करण्याची सवय लागण्याचा एक सुंदर उपक्रम म्हणजे स्काऊट गाईड चा खरी कमाई उपक्रम आहे, असे प्रतिपादन शालीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सिंधुदुर्ग भारतीय स्काऊट गाईडच्या जिल्हास्तरीय”कब बुलबुल” च्या शिबिरास शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी नुकतीच भेट दिली व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी केसरकर बोलत होते.
आपल्या शुभेच्छा पर मनोगतांमध्ये मंत्री केसरकर पुढे म्हणाले, .जगाबरोबर चालण्याला शिकवणार स्काऊट गाईड हां लहान वयात कष्ट करायला शिकवणारा विभाग आहे. सेवा, स्वयंशिस्त आणि नम्रतेमार्फत स्वतःची एक ओळख सिद्ध केलेला हा विभाग आहे. तो कोणत्याही शाळेत शैक्षणिक प्रगती बरोबर तेवढाच कौतुकास पात्र आहे. राष्ट्रधर्माचे धडे या विभागातूनच दिले जातील. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय स्तरावर ‘स्काऊट गाईड’ हा विभाग सक्तीचा केला जाणार आहे. असे सांगून शिबिराच्या आयोजनाबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा समन्वय आणि या आयोजनासाठी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर,संस्था सी इ ओ अमृता गाळवणकर व सेंट्रल स्कूल च्या शिक्षकासहित कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली. सहकार्य केले त्याबद्दलही सर्वांचे कौतुक करुन शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना (एकूण ६७३ यांना)शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर ,निवृत्ती प्राथमिक शिक्षक तथा भूतपूर्व स्काऊट गाईड शिक्षक प्रकाश दळवी, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी प्रेरणा मांजरेकर, सेंट्रल स्कूल च्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे व इतर आजी माजी स्काऊट गाईडचे शिक्षक उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.