तळेरे येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : सहभागासाठी आवाहन

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व तळेरे येथील प्रज्ञांगण आणि शिवमुद्रा स्पोर्टस् यांच्यामार्फत आयोजन

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व तळेरे येथील प्रज्ञांगण आणि शिवमुद्रा स्पोर्टस् आयोजित मुली आणि महिलांसाठी सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 30 जानेवारी रोजी होणार असून मर्यादित संघांना प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यातील खेळाडू 15 ते 29 वयोगटातील असले पाहिजेत. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व सर्व खेळाडूंना मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तर सहभागी प्रत्येक संघाला आकर्षक चषक व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांना प्रत्येक आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन 30 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!