तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा
विविध भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत तळेरे बाजारपेठ येथे विविध भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी तळे रे दशक्रोशितील असंख्य वाचकांनी भेट दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर व आदर्श व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण वरुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, सचिव मिनेश तळेकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सदस्य प्रा. हेमंत महाडिक, श्रावणी मदभावे, ध्रुव बांदिवडेकर, संतोष कल्याणकर, अशोक तळेकर, सचिन पिसे, राजू पिसे आणि वाचक उपस्थित होते.
या पुस्तक प्रदर्शनात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अत्यंत दुर्मिळ, प्रसिध्द आणि अनमोल अशा पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती. आपल्या वाचनालयातील इतरही अनेक ग्रंथ वाचकांना समजले पाहिजेत आणि इतर वाचनाकडे वळले पाहिजेत, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात हे प्रदर्शन आयोजित केलेल्या असंख्य वाचकांनी यावेळी भेट देऊन अनेक पुस्तकांची पाहणी केली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण