सेंद्रिय शेती मधून शेतकऱ्यानी उन्नती साधा!

परंपरागत कृषी विकास योजनेतंर्गत हुंबरट मध्ये प्रशिक्षण

परंपरागत कृषी विकास योजना(सेंद्रिय शेती) २०२३-२४ अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा,हुंबरठ येथे साकेडी , जानवली व हुंबरठ या गावातील ४ सेंद्रिय गटांचे पहिले शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले. या प्रशिक्षणास वक्ते म्हणून कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे मृद शास्त्र चे विषय विषेज्ञ श्री.विकास धामापूरकर , सेंद्रिय शेतीतज्ञ प्रगतशील शेतकरी श्री.मिलिंद खोत,हुंबरठ गावचे सरपंच मनीषा गुरव,आत्म्याचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.व्ही.एम.पाटील,मंडळ कृषी अधिकारी श्री.पवार,मास्टर ट्रेनर श्री. तेली,आय.सी.एस. श्री.सत्यवान राणे व सेंद्रिय शेती गटातील शेतकरी उपस्थितीत होते.सूरवातीला प्रस्तावना व सेंद्रिय शेतीचा उद्देश तसेच गटा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी उदा.माती परीक्षण,चर खोदणे,जैविक बांध,प्लास्टिक ड्रम खरेदी करणे,बीज प्रक्रिया तसेच शेतकरी व बी. ओ.डी.यांचे प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन केले.मृद् शास्त्र शास्त्रज्ञ के. व्हि.के.चे विकास धामापूरकर यांनी सेंद्रिय शेती संकल्पना, माती परीक्षणाचे महत्व ,जमिनीची आरोग्य पत्रिका,पिकांसाठी सेंद्रिय खते यांचा वापर,बीज प्रक्रिया व पाणी परीक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.प्रगतशील शेतकरी श्री.मिलिंद खोत यांनी सेंद्रिय शेती साठी देशी गाईचे महत्व ,शेणखत,गांडूळ खत,जीवामृत व बिजामृत याबाबत मार्गदर्शन केले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!