वरवडे चे दिगंबर उर्फ आप्पा सावंत यांचे निधन

गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात होते कार्यरत

कणकवली वरवडे फणसनगर येथील रहिवासी दिगंबर सदाशिव उर्फ आप्पा सावंत (70) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. आप्पा सावंत हे गेली अनेक वर्ष समाजकारण व राजकारणात सक्रिय होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयाशी त्यांचे चांगले संबंध होते. आप्पा या नावाने ते परिचित होते. राणे कुटुंबीयांशी जवळी असली व भाजपामध्ये कार्यरत असले तरी इतरही पक्षांच्या पदाधिकारी नेत्यांसोबत त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांच्यावर वरवडे फणसनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!