आचरा येथे शेती शाळा व शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न
तालुका मालवण येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा व फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबा पिकावरील फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्प अंतर्गत शेती शाळा व शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील किटक शास्त्रज्ञ डॉक्टर अजय मुंज प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तसेच एकनाथ गुरव तालुका कृषी अधिकारी मालवण, आचरा गावाचे सरपंच जेरोन फर्नांडिस ,उपसरपंच संतोष मिराशी,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कदम श्रुती सावंत
,कृषी सहाय्यक सुशील कुमार शिंदे, ग्रामस्थ उमेश सावंत,नारायण धूरी,समीर ठाकुर,अशोक मुळये,विलास सकृ,गोविंद गावकर,अंकुश परब,बाळा घाग्रे,गोपाळ गावकर,पपू चिंदरकर,योगेश पांगे इत्यादी शेतकरी आदी उपस्थित होते.बांधव उपस्थीत होते.या वेळी सिंधूरत्न समृध शेतकरी योजने अंतर्गत प्लास्टीक क्रेट्स व ताडपत्रि योजने मधे सहभागी होण्याचे आवाहन..श्री गुरव तालुका कृषी अधिकारी मालवण यानी केले अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी असल्याचे सांगितले आहे.तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री गावडे साहेब श्रीम फाळके मड्म कृ.प आचरा श्रीम थोरात मड्म कृ.प रामगड़ श्री कुरकुटे कृ.स अडवली उपस्थीत होते तालुका कृषी अधिकारी श्री गुरव साहेब यांनी फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्प या संदर्भात उपस्थित शेतकरी बांधवाना माहिती दिली. तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत फळमाशी नियंत्रणासाठी 75% अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या फळमाशी सापळे व लुर्स तसेच प्लास्टिक क्रेट्स व ताडपत्रि योजनेचा लाभ घेण्याचे अहवान केले.
डॉक्टर मुंज सर यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान आंबा पिकावर येणाऱ्या तुडतुडे, फुलकिडे, मिजमाशी, फळमाशी, कोयीती भुंगा इत्यादी विविध किडींविषयी व त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान मालवण तालुक्यातील किनारपट्टीवर असलेल्या आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोहर फुटून फलधारणा सुरू झाली आहे. त्यावर फुलकिडींचा प्रादुर्भाव सुरू झाला असून त्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे पहिली फवारणी स्पिनोसॅड 45 एस सी 2.50 मिली प्रति दहा लिटर पाण्यातून करावी व पाठोपाठ दहा दिवसांनी थायोमेथॉक्सोन 25 WG या कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात 3 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. असे केल्यास प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.तसेच शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर प्रत्यक्ष भेट देऊन फुलकीड विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
आचरा–अर्जुन बापर्डेकर