सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. सुनिता रामानंद यांची पदावरून उचलबांगडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी वेधले होते वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे लक्ष

डॉ.मनोज जोशी सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन डीन

सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या या पदाचा कार्यभार वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग मधील चे शरीरशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मनोज जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले होते. डॉ.सुनिता रामानंद यांच्याबाबत यापूर्वी अनेकदा माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय या डॉक्टरां मधील समन्वय नसल्याने अनेकदा रुग्णांचे देखील हाल होत होते. याबाबत श्री नाईक व कुडाळकर यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी पारित केले आहेत. डॉ.सुनिता रामानंद या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी औषधशास्त्र प्राध्यापक पदी कार्यरत होत्या. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यांच्याकडील कार्यभार काढून घेत डॉ. मनोज जोशी यांच्याकडे हा कार्यभार सोपविण्याचा आला आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!