शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या १९९६ च्या बॅच कडून विद्यालयाच्या प्रार्थना हॉलची रंगरंगोटी
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या इयत्ता १० वी च्या १९९६ च्या बॅचडून विद्यालयाची गरज ओळखून प्रार्थना हॉलची व दर्शनी भागाची आकर्षक रंगरंगोटी तसेच प्रार्थना हॉल मध्ये ६सिलिंग फँन व ६ ट्यूब लाइट्स बसवून दिल्या.असा एकूण ६० हजार रुपये एवढी रक्कम आपल्या ज्ञान मंदिरासाठी खर्च करून सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला.शाळेप्रती आत्मीयतेच्या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी टाकलेले पाऊल विद्यालायाच्या अन्य माजी विद्यार्थ्यांनसाठी निश्चितच एक प्रेरणादायी आहे. या कामी माजी विद्यार्थी श्री सुशील धुरी, श्री किरण सामंत, श्री श्रीकांत भगत, श्री नरेश धुरी, श्री सुशांत धुरी,श्री संतोष तेली,श्रीमती स्वप्नाली सामंत, श्रीमती माधवी सावंत आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली या विद्यार्थ्यांनी भविष्यातही विद्यालयाच्या भौतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहू असे सांगितले विद्यार्थ्यांना या कामी संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभूतेंडोलकर व संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी सर्व ते सहकार्य केले व संस्थेला व विद्यालयाला केलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले.
सावंतवाडी(प्रतिनिधी)