आचरा पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे साजरा

उर्दू शाळेच्या मुलांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती
आचरा पोलीस ठाणे येथे पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलीस नागरिक यांचे सुसंवाद व्हावा याकरिता काजीवाडा उर्दू हायस्कूल आचरा, ता. मालवण येथील विद्यार्थी व शिक्षक यांना आचरा पोलीस ठाणे येथे आमंत्रित करून 30 विद्यार्थी तीन शिक्षक यांना पोलीस दल रचना, कार्यपद्धती, पोलीस दलात प्रवेश करीता असणारे विविध संधी व स्पर्धा परीक्षेचे स्वरूप,पोलीस वापरात असलेले हत्यारे, दारूगोळा यांची माहिती महिला पोलीस उपनिरीक्षक एच आर पाटील, महिला पोलीस हवालदार मिठबावकर, पोलीस हवालदार जगताप यांचे कडून देण्यात आली. तसेच महिला व बालकां विषयी कायदे,सायबर गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक इ. विषयांवरही विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली.
आचरा, अर्जुन बापर्डेकर