शिवसंकल्प अभियानासाठी खारेपाटण विभागातून 500 शिवसैनिक होणार सहभागी- उपतालुकाका प्रमुख मंगेश गुरव

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा दौरा राजापुर येथील पदाधिकारी मेळावा आणि किरण( भैया )सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठरविणे या करीता नियोजन बैठक नुकतीच खारेपाटण शिवसेना विभागीय कार्यालयात पार पडली.
या वेळी खारेपाटण मधून जास्तीत जास्त कार्यकर्ते राजापुर मेळाव्याला नेण्याचे तसेच भैया सामंतांचा वाढदिवस विविध सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमानांनी साजरा करण्याचे ठरले. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, 10 वी 12 वी विद्यार्थी मार्गदर्शन आदी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले.
या बैठकीला जिल्हाप्रमुख संजय आंग्रे विधानसभा प्रमुख संदेश पटेल, युवा सेना जिल्हा प्रमुख-सुकांत वरूनकर महिला उपजिल्हाप्रमुख- नंदिनी पराडकर ,सरपंच- प्राची इसवलकर उपतालुका प्रमुख -मंगेश गुरव, कृषी उत्पन्न बाजार संचालक -मंगेश ब्रम्हडांडे ,ग्रामपंचायत सदस्य -गुरु शिंदे ,सुधाकर ढेकणे, सामाजिक कार्यकर्ते- गफार काझी आदी सह मोठ्या प्रमाणत शिव सैनिक उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!