किल्ले खारेपाटण संवर्धन समिती आणि समस्त ग्रामस्थ खारेपाटण यांच्या वतीने “शिवजन्मोत्सव सोहळा २०२६”कार्यक्रमाचे आयोजन

किल्ले खारेपाटणच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगत, व त्याचे जतन करीत यंदाचा ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे योजिले असून,
किल्ले खारेपाटण संवर्धन समिती आणि समस्त ग्रामस्थ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित या मंगल सोहळ्यास आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना द्यावी, ही नम्र विनंती करण्यात आली आहे.
दिनांकः गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ | स्थळः किल्ले खारेपाटण, ता. कणकवली
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ९:०० वा.: भव्य पालखी प्रदक्षिणा
(स्थळः एसटी स्टॅण्ड ते किल्ले खारेपाटण) विशेष आकर्षणः ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, बालमावळे आणि शिवकन्यांचा सहभाग.
सकाळी १०:०० वा.: मुख्य सोहळा
दुगदिवीला श्रीफळ अर्पण, शिवप्रतिमा पूजन आणि दिमाखदार ध्वजारोहण.
दु. १२:०० ते सायं ५:०० वा.: दर्शन व प्रस्साद.
निमंत्रक:
शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती
ग्रामपंचायत खारेपाटण
कालभैरव दुगदिवी मंदिर ट्रस्ट, खारेपाटण

error: Content is protected !!