कणकवली पर्यटन महोत्सव मध्ये इंडियन आयडॉलच्या दिग्गज कलाकारांचा धमाका

हास्य कलाकार सागर करांडे, हेमांगी कवीची उपस्थिती

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून महोत्सवाची रूपरेषा जाहीर

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्याचे बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन रात्री 9 वाजता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रात्री 8 वाजता शशांक कल्याणकर यांचा नामांकित ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे. यावेळी हास्य कलाकार फु बाई फु फेम सागर करांडे, हेमांगी कवी यांची उपस्थिती असणार आहे. 12 जानेवारी रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व सुहास वरूनकर व हरिभाऊ भिसे हे करणार आहेत. स्थानीक कलाकारांना यानिमित्ताने वाव मिळणार आहे. 13 जानेवारी रोजी इंडियन आयडॉल ची टीम येणार आहे. 13 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला इंडियन आयडॉल सायली कांबळे, आशिष कुलकर्णी व निहाल तवरो, यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. तर समारोपादिवशी 14 जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप रात्री 9 वाजता केला जाणार आहे. तत्पूर्वी रोजी प्लेबॅक सिंगर दिव्य कुमार, नचिकेत लेले, चेतना भारद्वाज व संचिता गर्गे यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!