भारत विस्तार AI ॲपचा शुभारंभ

केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे हस्ते शुभारंभ
किर्लोस कृषि विज्ञान केंद्राद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
भारत विस्तार AI शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्र ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अचूक, विश्वसनीय व वेळेत माहिती पोहोचविण्यासाठी भारत विस्तार AI आधारित एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा राष्ट्रीय शुभारंभ जयपूर राजस्थान येथे मा. केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते तसेच राजस्थानचे मा. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण किर्लोस कृषि विज्ञान केंद्रा द्वारे करण्यात आले.
भारत विस्तार हे शेतकऱ्यांसाठी एक एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार असून या मार्फत शेतकऱ्यांना माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, पीक व पशुपालन सल्ला तसेच तक्रार निवरण सेवा स्थानिक भाषेत मोबाईल ॲप द्वारे उपलब्ध होणार आहे. भारत विस्तार हे कृषि क्षेत्रातील AI साठीचे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून कार्य करणार आहे. पीएम किसान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका, पीक व पशुपालन सल्ला, किड व रोग सल्ला, हवामान अंदाज, बाजारभाव, हवामान आधारित कृषि सल्ला अशा प्रकारच्या सेवा सुविधा या ॲप द्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा अशी माहिती किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी दिली.





