किल्ले भगवंतगड येथे १९ फेब्रुवारी साजरा होणार शिवजयंती उत्सव…!

इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांचे व्याख्यान प्रमुख आकर्षण
चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी यांचे आयोजन
चिंदर गावचा मानबिंदू ऐतिहासिक किल्ले भगवंतगड येथे चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी, चिंदर ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने व श्री देव सिध्देश्वराच्या आशीर्वादाने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे. सकाळी ९.३० वाजता भगवंतगड शाळेकडून किल्ल्याकडे प्रस्तान, सकाळी १० वाजता शिव प्रतिमा पूजन, श्री देव सिध्देश्वराला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ, सकाळी १०:१५ वा. अल्पोपहार, सकाळी १०:३० वा. शिवजन्मोत्सव पाळणा,१०:४५ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रसंग सादरीकरण (चिंदर गावातील जि. प. प्राथमिक शाळा), १०:१५ वा. श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आकर्षक दिंडी नृत्य, पोवाडा( आशिष कोरगांवकर आणि सहकारी) ११:३० वा. श्री रणजित हिर्लेकर सर (शिवराज भूषण नाटकाचे लेखक, इतिहास संशोधक) यांचे व्याख्यान, १२:०० वा. मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक (वरद जोशी आणि सहकारी) १२:३० वा. सन्मान आणि समारोप असा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाला सरपंच/ ग्रामपंचायत अधिकारी चिंदर, जेष्ठ साहित्यिक, कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर (गुरुजी), शिवप्रेमी उपस्थित राहणार असून समस्त शिवप्रेमी व चिंदर ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन चिंदर सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.




