जिल्हा परिषद केंद्र शाळा शेर्पे येथे खाद्य जत्रा महोत्सव संपन्न

जिल्हा परिषद केंद्र शाळा शेर्पे येथे नुकतेच खाद्य जत्रा महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या खाद्य जत्रा महोत्सवाचे उदघाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. माजी वित्त व बांधकाम समिती सभापती रवींद्र जठार यांचा जिल्हा परिषद केंद्र शाळा शेर्पे यांच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका महाडेश्वर मॅडम यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खाद्य महोत्सवात विद्यार्थी व सोबत पालकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रमाणात प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती व सहभाग नोंदवला होता. या खाद्य जत्रेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आणले होते. व त्या पदार्थाची ओळख व ते पदार्थ कसे तयार केले याची माहिती देखिल उपस्थित मान्यवरांना देत होते. विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी यांच्या उत्तम नियोजनामुळे हा खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच – स्मिता पांचाळ, माजी सरपंच – निशा गुरव, पोलिस पाटील – विनोद शेलार, सत्यविजय शेलार – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, प्रताप राऊत – उपाध्यक्ष,
ब्राह्मदंडे गुरुजी, तांबे सर, केसरकर सर, महेंद्र शेलार, सदानंद शेलार, रामा पांचाळ, रज्जाक मुजावर, मौलाना, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसखी, पालक ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!