आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आचरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

शिवजयंती निमित्त लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने जिल्हा परीषद सदस्या वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या आयोजनातून शिवसेनेतर्फे आचरा तिठा किल्ला लॉज जवळ गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे, पंचायत समिती प्रमुख जयप्रकाश परुळेकर यांनी केले आहे.





