कोकणवासीय श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरू दत्तात्रयांचे निस्सीम भक्त – महेश इंगळे

माणगाव येथील श्री दत्त मंदीराला वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांची भेट
श्री स्वामी समर्थांच्या व श्री गुरू दत्तात्रयांच्या भक्तीचा महीमा संपूर्ण तळकोकणात अचंबीत करणारा आहे. कोकणवासियांना निसर्गासह दत्त सांप्रदायिक भक्तीचे अद्भुत वरदान आहे. यानिमीत्ताने कोकणवासीय भाविक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरू दत्तात्रयांचे निस्सीम भक्त असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट येथील दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी काढले. माणगाव येथील श्रीदत्त मंदीरास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
नुकतेच झालेल्या आपल्या कोकण दौऱ्यात नगरसेवक महेश इंगळे यांनी चिरंजीव तथा युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे व मित्र परिसरासह सिंधुदूर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील प.पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी प्रस्थापीत श्री दत्त मंदीरास भेट देऊन श्रीगुरु दत्तात्रयांचे मनोभावे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुभाष भिसे यांनी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांचा श्री गुरु दत्तात्रयांचे शाल, श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला.
यावेळी माणगाव श्री दत्त मंदीराचे उपाध्यक्ष महेश बांदेकर, सचिव दिपक साधले, सहसचिव सुधीर ओळकर, मुख्य कार्यकारी विश्वस्त माधव चव्हाण, विश्वस्त सहदेव नाईक, गुरूनाथ गणपत्ये, हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर, संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, कोकण कट्टयाचे संस्थापक कुमार पितळे, महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवार सदस्य ज्ञानेश्वर भोसले, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, अंकूश केत, मेजर अमोल माने, मनोज इंगुले, सुनिल पवार, नंदकुमार कटारे, रामलिंगय्या स्वामी, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, कुमार हत्तूरे, रमेश शिंदे सर, स्वप्निल गायकवाड, सुरेश वाले, बाबा सुरवसे, संदीप पंडीत, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, महेश मस्कले, लखन सुरवसे, अरूण शिंदे, बंटी नारायणकर, शंकर मलवे आदींसह अन्य उपस्थित सदस्य व भाविक भक्त उपस्थित होते.





