बॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,आचरा प्रशालेचे यश

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित सानेगुरूजी वाचन मंदिर धुरीवाडा मालवण येथे तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शाळेचे नाव उज्वल केले आहे.
कथाकथन स्पर्धेत ५वी ते ७वी या गटात
कु. एंजल स्टीफन फर्नांडिस – तृतीय क्रमांक प्राप्त केला तर कु.नुर्वी गिरीश शेटगे- उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक
गीत गायन स्पर्धा इ.८वी ते १०वी या गटात भक्तीगीत, भावगीत, देश भक्ती पर गीतनाट्यगीत यापैकी एक गीत गायचे होते यामध्ये कुमारी भूमी आशिष नाबर – प्रथम क्रमांक
व कुमारी स्वरा अनिरुद्ध आचरेकर – द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे संस्थापदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
आचरा–अर्जुन बापर्डेकर




