वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देवघोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपत्न होत आहे.


३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव कोंब्या जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला पावणारा देव म्हणून श्री देव
घोडेमुखाची ख्याती महाराष्ट्र राज्य बरोबर गोवा , कर्नाटक राज्यात पण पसरली आहे. आपल्या मनोकामना
पूर्ण होण्यासाठी देवाला कोब्याचा नवस बोलला जातो.व जत्रोत्सवावेळी
फेडला जातो .शेकडो वर्षाची परंपरा आजही भक्तीभावे सर्व
भक्तगण श्रद्धेने पाळतात.दरवर्षी वाढता चाललेली भक्तगणांची गर्दी या देवाची महती सांगून जाते.या जत्रेसाठी सिंधुदुर्ग सोबत मुंबई ,पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच
राज्यांमधून भाविक दर्शनासाठी येतात.

उंचावर असलेल्या श्री देव घोडेमुख देवाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न होत. या श्री देव घोडे देवाच्या कोंबड्याच्या जत्रोत्सवाचा भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी वर्ग व देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!