युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे उद्गार
कलमठ युवा सेनेच्या वतीने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन
कणकवली : युवासेनेच्या वतीने युवकांचे संघटन करत समाजाभिमुख कामे करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन युवा सेना काम करत असून, कलमठ विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करून जपले असल्याचे उद्गार युवा सेना जिल्हाप्रमुख जिल्हा बँक संचालक नगरसेवक सुशांत नाईक यांनी काढले.कलमठ मध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अनुप वारंग, शिवसेना कलमठ विभागप्रमुख,राजू राठोड, युवासेना जिल्हा समनव्यक रिमेश चव्हाण, युवासेना विभाग प्रमुख नितेश भोगले,सिकंदर मेस्त्री,संकेत गुडेकर,संदीप कांबळी,किरण हुन्नरे,सचिन पेडणेकर आदि उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली