कणकवली टेंबवाडी रस्त्यावर उतरलेले “ते” चिरे अखेर नगरपंचायत कडून जप्त

वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने नगरपंचायत च्या पथकाची कारवाई
कणकवली शहरातील टेंबवाडी या ठिकाणी नगरपंचायत च्या रस्त्यावर चिरे उतरून ठेवल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होत असल्या प्रकरणी कणकवली नगरपंचायत च्या पथकाने आज धडक कारवाई करत रस्त्यावर टाकलेले एक ट्रिप जवळपास सुमारे चारशे जिरे जप्त केले. कणकवली नगरपंचायत च्या पथकाने या या घटनास्थळी आज दुपारी धडक दिली. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रस्त्यावरील चिरे हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला. या घटनेनंतर टेंबवाडी मधील हा गेले दोन दिवस अडवलेला रस्ता वाहतुकीस खुला झाला आहे. या कारवाईमध्ये कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी मनोज धुमाळे, प्रशांत राणे, संतोष राणे, सचिन नेरकर रवी महाडेश्वर, यांच्यासह नगरपंचायत चे अन्य कर्मचारी व सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.
कणकवली प्रतिनिधी




