सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे २०-२१ जून रोजी निवड चाचणी

सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे जिल्हा निवड चाचणी 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० आणि २१ जून रोजी संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे हि जिल्हा निवड चाचणी 2026 होणार आहे.
या स्पर्धात्मक निवड चाचणीत सिंधुदुर्ग जिल्हामधून १५० पेक्षा जास्त खेळाडू बॅडमिंटन मध्ये आपला खेळ दाखवतील. त्यासाठी मुले/मुली यांचे ९, ११, १३, १५, १७, १९ व खुलाअसे गट निश्चित करण्यात आले असून स्पर्धा एकेरी, दुहेरी, मिक्स दुहेरी अशा स्वरूपात खेळली जाणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ जून २०२६ आहे. अर्ज www.mbasso.in ह्या संकेत स्थळावर करावयाचे आहेत. स्पर्धेचे उद्घाटन २० जून रोजी होणार आहे. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रथम क्रमांकाची रक्कम रुपये आणि उपविजेत्या खेळाडूंना रुपये रोख पारितोषिक व भव्य करंडक (ट्रॉफी) देऊन सन्मानित करण्यात येईल.
ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव देणे किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे, नवीन खेळाडूंना प्राधान्य देणे असा या स्पर्धेचा उद्देश आहे. तसेच जिल्हा निवड चाचणीमधून जे खेळाडू विजयी होतील त्यांची राज्य संघासाठी सिंधदुर्ग जिल्हा संघामध्ये निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी राज चव्हाण (9405809001) किंवा समद शेख (7775808295) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सर्व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.





