जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!

अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार
कणकवलीतील आत्माराम राणे यांचा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा
कणकवली शहरातील माझ्या जमिनीतील न.भु.क्र 1738 शेती या पुढे बिन या शब्दाचा प्रयोग करुन खोटी बिनशेती करण्यात आली आहे. यासाठी कणकवली भुमी अभिलेख व कणकवली नगरपंचायत कडे वारंवार कार्यवाही करुन सुद्धा संबधितावर कारवाई होत नाही. म्हणून प्रजासत्ताक दिन दिवशी बेमुदत उपोषण ला बसलो होतो. माझी जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केली होती. सर्व पुराव्यानिशी माहिती दिली होती. परंतू माझ्या तक्रारीला गांभियाने न घेता आज पर्यंत संबधित व्यक्तिवर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. यावरुन असे दिसुन येतं की, कणकवली नगरपंचायत व भुमी अभिलेख कार्यालय कणकवली हे त्यांना पाठीशी घालत आहेत. कारण गेली दोन वेर्षे मी सातत्याने पाठपुरावा अर्ज, कागदोपत्री पुरावे सादर करुन सुद्धा आज पर्यंत त्या व्यक्तिंवर व अनधिकृत बांधकामवर कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही. अनधिकृत बांधकामाला काढुन टाकण्याची नोटीस देऊन कारवाई होत नसते. ते प्रत्यक्षात कार्यवाही करायची असते तरच कारवाई होते. त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मी आत्माराम राणे पुढील 10 दिवसात सर्व कागदपत्र तपासल्यानंतर संबंधित दोशींच्या विरोधात फौजदारी गुन्हा अंतर्गत कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या बाहेर फौजदारी गुन्हा अंतर्गत कारवाई होण्यासाठी उपोषणाला बसणार आहे. तरी सदर प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आत्माराम राणे यांनी कणकवली पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.






