वृक्षलागवड मोहिमेचा १३ जूनला कुडाळात शुभारंभ

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी मंदार शिरसाट यांचा पुढाकार

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवार दिनांक १३ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता येथील महालक्ष्मी मंदिर पासून होणार आहे.
कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे असे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सांगितले. शुभारंभ प्रसंगी माजी आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. यावेळी बेल, आवळा, जरुळ, करंज, महोगनी, शेवगा, बहावा, चिंच, कुरुमी, कांचन, पळस इत्यादी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. ‘एकच ध्यास, हरित कुडाळचा विकास’ या टॅगलाईन अंतर्गत होणाऱ्या या वृक्षलागवड प्रसंगी परिसरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदार शिरसाट यांनी केले आहे.

error: Content is protected !!