एसारएम कॉलेजमध्ये उद्या विद्यार्थी व पालकांसाठी ‘इंडक्शन प्रोग्रॅम’चे आयोजन

नामवंत तंत्रज्ञान उद्योजक बिजल मेहता यांची प्रमुख उपस्थिती

येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रथम वर्ष प्रवेशित सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी भव्य ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ (दीक्षारंभ सोहळा) चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ११ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता महाविद्यालयाच्या भव्य ‘एकनाथ ठाकूर सभागृहात’ संपन्न होणार आहे.
​ नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे आणि त्यांना महाविद्यालयाची शिस्त, शैक्षणिक वातावरण व विविध उपक्रमांची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशातील नामांकित तंत्रज्ञान उद्योजक बिजल मेहता उपस्थित राहणार असून, ते नवीन पिढीला तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील नव्या संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
​ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एम. एस. पी. मंडळाचे उपाध्यक्ष ए. आर. शिरसाट असून याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष के. ए. सामंत आणि सरचिटणीस ए. ए. वैद्य यांची देखील सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
​ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी सर्व प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!