कुडाळ न.प. कडून मिळणार आता ऑनलाईन घरपत्रक उतारा

कुडाळ नगरपंचायत मधून आता ऑनलाईन घरपत्रक उतारा मिळणार आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नवीन संगणकीय (Software) प्रणालीप्रमाणे मालमत्तेचा असेसमेंट उतारा (Assessment Extract) हा संबंधित मालमत्तेचा चालू आर्थिक वर्षातील घरफाळा/मालमत्ता कर पूर्णपणे भरलेला असल्यासच उपलब्ध करून देता येणार आहे.
त्यामुळे ज्यांना असेसमेंट उतारा आवश्यक आहे त्यांनी प्रथम चालू वर्षाचा घरफाळा/मालमत्ता कर भरून त्याची खात्री करावी. घरफाळा/कर चालू किंवा थकबाकी असल्यास असेसमेंट उतारा ऑनलाईन पोर्टलमधून निघत नाही. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!