कुडाळचा प्रारूप आराखडा अवलोकनार्थ उपलब्ध

८ जुलै पर्यंत हरकती नोंदविण्याचे न.प. चे आवाहन

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला आहे. या योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल नागरीकांच्या अवलोकनार्थ कुडाळ नगरपंचायत येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरीकांनी ही सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत म्हणजे 8 जूलै पर्यंत कुडाळ नगरपंचायत, कुडाळ या कार्यालयाकडे प्रारुप विकास योजनेतील तरतुदीसंबंधी सुचना/हरकती लेखी स्वरुपात कारणांसह कुडाळ नगरपंचायत येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन कुडाळ नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!