बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा प्रकरणी जामीन मंजूर

संशयीताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

बँक ऑफ इंडियाच्या असेट रिकव्हरी ब्रँच कोल्हापूरचे व्यावस्थापक व शिरगांव शाखेच्या कर्मचाऱ्यांना वसूलीला अटकाव केला. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गाडी फोडली व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुजितकुमार सुधाकर तावडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. सुधीर देशपांडे यांनी १५ हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१० मार्च २०२६ रोजी बँक ऑफ इंडियाचे असेट रिकव्हरी शाखा कोल्हापूरचे मॅनेजर रवी श्रीखंडे व शिरगांव शाखेचे अधिकारी व शिपाई शासकीय वाहनातून कर्ज वसूलीसाठी कळसुली येथे गेले होते. कर्जदार सुजितकुमार तावडे याला त्याचा राग आल्याने त्याने भारत सरकारच्या शासकीय वाहनाच्या पुढील मागील काचा लोखंडी रॉडने फोडल्या. तसेच अधिकाऱ्यांच्या अंगावर लोखंडी रॉड घेऊन जीवे ठार मारण्यासाठी धावला. तसेच पुन्हा वसूलीसाठी याल तर ठार मारेन अशी धमकी दिल्याप्रकरणी रवी श्रीखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भा.न्या.सं. १०९ (१), १३२, ३५२, ३५१ (३), ३२४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याच्या जामिनासाठी दाखल अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने तपासकामात सहकार्य करावे, पोलीस स्टेशनला हजेरी लावावी अशा अटींवर १५ हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!