राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या इशाऱ्यानंतर अखेर हळवल फाट्यानजीक रंबलर चे काम सुरू

उर्वरित कामे देखील लवकर मार्गी लावण्याची जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांची मागणी
अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना हव्यात
अनेक अपघातानंतर अनेकदा मागणी करून देखील त्याकडे पुरते दुर्लक्ष करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण चे कान राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी काही दिवसांपूर्वी टोचल्यानंतर अखेर महामार्ग प्राधिकरण कडून कणकवली तालुक्यातील गड नदी पुला नजीकच्या हळवलं फाट्याजवळ रंबलर लावण्याचे काम आजपासून हाती घेण्यात आले. अनेकदा या ठिकाणी मोठे अपघात होत जीवितहानी झाली होती. अनेक वाहने या अवघड वळणावर पलटी होऊन वाहनांचे वाहनातील मालाचेही मोठे नुकसान झाले होते. महामार्ग प्राधिकरणाने या अवघड वळणा बाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. व त्यामुळे सातत्याने अपघात होऊन होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा खडा सवाल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन देत याप्रसंगी उपस्थित असलेल्या शाखा अभियंता एम आर साळुंखे यांना काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली होती. अन्यथा जरी सत्तेत असलो तरी तीव्र आंदोलन छेडू व महामार्ग प्रसंगी बंद करू असा इशारा देण्यात आला होता. तहसीलदार श्री देशपांडे यांनी देखील ही बाब गांभीर्याने घ्या व
तात्काळ उपयोजना करा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच श्री नाईक यांनी या वळणावर हलवलं फाटा या ठिकाणी ब्लिंकर बसवणे व हायमास्ट बसवा अशी मागणी केली होती. अखेर पहिल्या टप्प्यात रंबलर ची मागणी प्रत्यक्षात हाती घेण्यात आली असून, उर्वरित मागण्या देखील पूर्ण करा अशी फेर मागणी श्री. नाईक यांनी केली आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली