कणकवलीत दुकानांच्या पाट्या मराठीत करा-मनसेची आग्रही मागणी.

कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना मनसेचे निवेदन.
कणकवली/मयुर ठाकूर.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात असलेल्या दुकाने आणि आस्थापणे यांनी आपल्या दुकानांचे व आस्थापनांचे फलक बोर्ड मराठी मध्ये लावण्याबाबत आदेश ऑक्टोबर 2023 मध्ये दिला व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 25 नोव्हेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली होती.त्यानंतर अंमलबजावणी न करणाऱ्या दुकाने व आस्थापने यांना दंड आकारणे अपेक्षित आहे.परंतु आपल्या कार्यक्षेत्रात कणकवली शहरात बहुतांशी दुकाने व आस्थापने यांनी याची अंमलबजावणी केलेली नाही.सदर आदेशाची अंमलबजावणी न करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असे होते.सर्वोच्च न्यायालयच्या आदेशाची अंमलबजावणी करणे प्रशासकीय प्राधिकरण या नात्याने आपल्या कार्यालयाचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच शांताराम सुरेश साधिये मनसे कणकवली तालुका अध्यक्ष यांनी आज मुख्याधिकारी कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे निवेदन देत आपली मागणी स्पष्ट केली. यावेळी मनसे कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये,अनिकेत तर्फे- महाराष्ट्र विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष, अतुल दळवी, योगेश कदम, अनंत आचरेकर,दत्ताराम अमृते, रंजीत सावंत, समीर सावंत व इतर मनसैनिक उपस्थित होते.