बाहेरून आलेली पार्सले सावंतवाडीकर स्वीकारणार नाहीत

बॅनर लावण्यामागे, फाडण्यामागे विरोधातील “विकृती
राजन पोकळे माजी उपनगरध्यक्ष यांची पत्रकार परिषदेत टीका
सावंतवाडी विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लावून किंवा फाडून या ठिकाणी कोणी निवडून येणार नाही. बाहेरून आलेली पार्सले सावंतवाडीची जनता पुन्हा बाहेर पाठवतील अशी जोरदार टीका माजी उपनगराध्यक्ष तथा शिंदे नेते राजन पोकळे यांनी सावंतवाडी येते पत्रकार परिषदेत केली . केसरकर यांनी पुन्हा विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मात्र ही विकृती येथील जनता कदापि खपवून घेणार नाही.
शिंदे गटाचे नेते श्री पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन बॅनर फाडणाऱ्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध केला. या प्रकारात मागे जे कोणी आहेत ते स्थानिक नाही तर बाहेरचे आहेत. श्री. केसरकर यांनी विधानसभा लढवण्यात बाबत पुन्हा इच्छा प्रकट केल्यामुळे हे सर्व प्रकार होत आहेत. परंतु बाहेरच्या पार्सलांना येथील जनता स्वीकारणार नाही. बॅनर फाडणे किंवा विरोधात बॅनर लावणे या प्रकारामागे नेमके कोण आहेत, हे सर्वांना माहित आहे, असे पोकळे म्हणाले.श्री. केसरकर यांनी आपल्या ३ वेळेच्या आमदारकीच्या काळात जिल्ह्याचा विकास केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना पुन्हा नक्कीच निवडून देईल, असा विश्वास श्री. पोकळे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषद वेळीं हे तालुकाप्रमुख नारायण राणे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर उपस्थित होते.
सावंतवाडी