कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची मुजोरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडीतील रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे युवा कार्यकर्ते श्री. मिहिर मठकर, श्री. विनायक गवस, श्री. भूषण बांदीवडेकर आणि त्यांचे सहकारी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता यांची भेट घेतली. श्री संजय गुप्ता यांनी उडावा उडवीची उत्तरे देत त्यांचा अवमान केला. एवढ्यावरच न थांबता श्री. संजय गुप्ता यांनी रेल्वेशी संबंधित मागण्यांसाठी लढणारे स्व. डी. के. सावंत यांच्याबद्दलही अपमानास्पद वक्तव्य केले. “तमाम सावंतवाडीतकरांचा हा अपमान असून याचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते.” अशी संतप्त भावना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी व्यक्त केली.
कोकण रेल्वे प्रशासनाची ही घमेंड उतरवण्यासाठी दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या आंदोलनास मी सक्रिय पाठिंबा जाहीर करते असेही अर्चना घारे – परब यांनी जाहीर केले.





