कोकण नाऊ प्रीमियर लीग सर्वांपर्यंत पोहोचली !

व्हरेनियमच्या विनायक जाधव यांनी कौतुकोद्गार

व्हरेनियमतर्फे २१ ला कुडाळ मध्ये भव्य रोजगार मेळावा

कुडाळ मध्येच होतंय देशातील भव्य डेटा सेंटर

प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ प्रीमियर लीग गेली तीन वर्ष चांगल्या प्रकारे आयोजित केली जात आहे. त्यामुळेच व्हारेनियम क्लाउड गेली तीन वर्ष सातत्याने हि स्पर्धा प्रायोजित करत आहे. नेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा तळागाळापर्यंत पोहोचली असून या स्पर्धेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे प्रतिपादन व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव यांनी केले. कोकण प्रीमियर लीग या स्पर्धेचा शुभारंभ आज मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना विनायक जाधव पुढे म्हणाले, व्हारेनियम-कोकण नाऊ क्रिकेट प्रीमिअर लीगच्या या आयोजनाबद्दल कोकण नाऊचे संचालक विकास गावकर यांचे मी अभिनंदन करतो आणि स्पर्धेला शुभेच्छा देतो. कारण या स्पर्धेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले जाते. व्हरेनियम क्लाउड कंपनीतर्फे या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली जातेय त्याचे हे तिसरे वर्ष आहे. मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसऱ्यावर्षी हि स्पर्धा आम्ही प्रायोजित केली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याही कंपनीच्या बऱ्याच गोष्टी, कंपनीची कार्यपद्धती लोकांपर्यंत पोचते आहे. व्हरेनियम क्लाउड हि कंपनी गेली चारवर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करीत आहे. येथील बरेचसे विद्यार्थी,कॅन्डिडेट्स यांच्या पर्यंत पोहोचण्याचा आम्ही या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी सावंतवाडी प्रमाणे प्रत्येक तालुक्यात आम्ही एडमिशन सेंटर्स सुरु करणार आहोत. देशातले सर्वात मोठे डेटा सेंटर लवकरच आम्ही कुडाळ मध्ये सुरु करीत आहोत. त्याचबरोबर सावंतवाडी प्रमाणे आम्ही कुडाळमध्ये सुद्धा २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा घेणार आहोत. असे बरेच कार्यक्रम आम्ही व्हरेनियम क्लाऊडच्या माध्यमातून जिल्हावासीयांसाठी राबवणार आहोत. गेल्या वर्षी कोरोनाचा काळ असूनसुद्धा कोकण नाऊ प्रीमियर लीगला लोकांनी डोक्यावर घेतले. यु ट्यूबच्या माध्यमातून हि स्पर्धा लाखो लोकांपर्यंत पोहोचली. अशी स्पर्धा भरवणं यात विकास गावकर यांचा मोठा वाटा आहे, असे व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधवयांनी सांगितले. तसेच कोकण नाऊची टीम आणि येथे खेळणारे संघ आणि खेळाडू याना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, विशाल सेवा फाउंडेशनचे संचालक तथा उद्योजक विशाल परब, व्हरेनियम क्लाऊडचे चीफ अँड नेटवर्क हेड मुंबई मुकुंदन राघवन, व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव, बँक ऑफ बरोडाचे कुणालकुमार, जि प चे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, पत्रकार परिषदेचे पदाधिकारी नंदकिशोर महाजन, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, सौ. वैशाली गावकर, ओंकार गावकर आदी मान्यवरउपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, मालवण.

error: Content is protected !!