व्हरेनियम-कोकण नाऊ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद
बँक ऑफ बडोदाच्या कुणाल कुमार यांनी स्पर्धेचे केले कौतुक
व्हरेनियम – कोकण नाऊ प्रीमियर लीगचा शुभारंभ
प्रतिनिधी । मालवण : कोकणचे नंबर वन चॅनेल कोकण नाऊने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद आहे अशा शब्धत बँक ऑफ बडोदाचे अधिकारी कुणाल कुमार यांनी स्पर्धेचे कौतुक केले. या स्पर्धेचा शुभारंभ आज मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर झाला त्यावेळी ते बोलत होते.
कुणाल कुमार यावेळी बोलताना म्हणाले, क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. तसा तो माझाही होता. पण आता कामामुळे खेळता येत नसले ‘तरी क्रिकेटची आवड कमी झालेली नाही. विकास गावकर यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहेत आणि सामाजिक जाणिवेतून हि गोष्ट नक्कीच वेगळा विचार करायला लावणारी आहे. मी कोकण नाऊला आणि विकास गावकर यांचे अभिनंदन करतो आणि त्याना शुभेच्छा देतो. कारण आपल्या देशात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही आहे तर लोकांच्या मनात त्याविषयी एक तीव्र भावना आहे. ज्या ज्या वाहिली आपण क्रिकेट पाहतो त्यावेळी आपण आपली टेशन्स विसरतो. खेळाचा आनंद घेतो. कोकण नाऊने या स्पर्धेचे फार चांगल्या प्रकारे आयोजन केले आहे, त्यासाठी मी विकास गावकर यांचे अभिनंदन करतो. त्याच बरोबर सर्व संघाना आणि खेळाडूंना शुभेच्छा देतो. असे बँक ऑफ बडोदाचे कुणाल कुमार यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, विशाल सेवा फाउंडेशनचे संचालक तथा उद्योजक विशाल परब, व्हरेनियम क्लाऊडचे चीफ अँड नेटवर्क हेड मुंबई मुकुंदन राघवन, व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव, बँक ऑफ बरोडाचे कुणालकुमार, जि प चे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, पत्रकार परिषदेचे पदाधिकारी नंदकिशोर महाजन, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, सौ. वैशाली गावकर, ओंकार गावकर आदी मान्यवरउपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, मालवण.