शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस अभिवादन

शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, राजू राणे, संतोष परब, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!