जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची १८ रोजी सर्वसाधारण सभा

ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे,एनटी प्रवर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या अराजकीय समाज संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० ते सायं.६.३० या वेळेत महालक्ष्मी हॉल,पंचायत समिती जवळ, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.. या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे,एनटी प्रवर्गातील सर्व समाजाचे जिल्हाध्यक्ष, सर्व समाजातील प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक, महासंघाचे सर्व पदाधिकारी/सदस्य यांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके आणि महासचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
या सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत.
सभेची विषयपत्रिका पुढीलप्रमाणे :-
1) ओ.बि.सी.आरक्षणा बाबत शासन यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने करावयाच्या आंदोलनाची दिशा ठरविणे.
2) तालुकानिहाय संपर्क दौऱ्याचे तपशिलवार नियोजन करणे.
3) महासंघाचा वैचारीक व धोरणात्मक पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक केडर कॅम्पस्च्या आयोजनाच्या तारखा व ठिकाणे निश्चित करून जबाबदाऱ्यांचे वाटप करणे.
4) मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व मंत्रालय स्तर , मुंबई येथे विविध विभागाशी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्या बाबतचे नियोजन करणे.
5) दिनांक 26/11/2023 रोजी संविधान दिन साजरा करण्या बाबतचे नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित करणे.
6) पोलीस पाटील पद भरती बाबत मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा आयोजित करण्या बाबतचे नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित करणे.
7) महासंघाचा आर्थिक पाया मजबूत करण्या बाबत नियोजन करणे.
8) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे,एनटी प्रवर्गातील सर्व समाजाचे जिल्हाध्यक्ष, सर्व समाजातील प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक, महासंघाचे सर्व पदाधिकारी/सदस्य यांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके आणि महासचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.