दिपावलीच्या पूर्वसंध्येला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभेच्छा भेट.

ब्युरो । नवीदिल्ली : गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिपावलीच्या पूर्वसंध्येला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या कुटुंबा समवेत भेट घेवून उज्वल भारताच्या नेतृत्वासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या वेळी अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातही विशेष वेळ काढून मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियासमावेत दिलखुलास गप्पा केल्या. सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान मोदी यांनी आपुलकीने व स्नेहापूर्वक भेटीसाठी दिलेल्या बहुमोल वेळे बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवीदिल्ली.

error: Content is protected !!