आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सत्यवान गावकर प्रथम

एसके प्रॉडक्शन हाऊसचा उपक्रम
रंगभूमी दिनाचे औचित्य
निलेश जोशी । कुडाळ : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून एसके प्रॉडक्शन हाऊस यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सत्यवान गावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. संपूर्ण जगभरातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
दि. ३१ ऑक्टोबर रोजी ‘अनसिन कोकण’ या युट्युब वाहिनीवर सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. प्रेक्षकांची आवड आणि परीक्षकांचे मत लक्षात घेऊन उकृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी unseen kokan instagram live वरून विजेत्या स्पर्धकांची नावे एसकेप्रोडक्शन हाऊसचे संस्थापक सचिन कोंडस्कर, प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता शिर्के , युवा अद्योजक आणि या स्पर्धेचे प्रायोजक जयतीर्थ राऊळ, या स्पर्धेला लाभलेले संयोजक हर्षवर्धन जोशी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रथम सत्यवान गावकर, द्वितीय आकाश सकपाळ, तृतीय क्रमांक विभागून गजेंद्र कोठावळे आणि आर्य आढव यांनी मिळविला आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या प्रसिद्धी साठी अभिनेत्री तन्वी मुंडले, रुचिता शिर्के, विश्वजीत पालव, आद्या कोयंडे , निलेश गुरव, अक्षता कांबळी, विवेक वाळके, सिद्धेश चव्हाण यांनी व्हीडियोच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहचव्यासाठी प्रयत्न केला. त्याच बरोबर डॉ. प्रणव प्रभू , बंटी कांबळी, मंदार शेटिये यांनी विविध माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोहचव्यासाठी प्रयत्न केले. या स्पर्धेचे परीक्षण अमित अनंत घाडगे मुंबई(लेखक दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर), जयेश कांबळे मुंबई(लेखक दिग्दर्शक) यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





