‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवाची यशस्वी सांगता

डॉ. अमेय देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

शेवटच्या दिवशी पाककला स्पर्धा आणि लकी ड्रॉचा निकाल जाहीर

निलेश जोशी । कुडाळ : नर्मदाआई संस्थेच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सव आणि प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाची रविवारी यशस्वी सांगता झाली. या महोत्सवादरम्यान अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आयोजकांचे कौतुक केले.
नर्मदाआई संस्थेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी मी आत्मनिर्भर या खरेदीमहोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १ नोव्हेम्बर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महालक्ष्मी हॉल मध्ये हा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवात एकूण ३२ स्टॉल्स मांडण्यात आले होते. संपूर्ण खरेदी महोत्सवाला ग्राहकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी महोत्सवाला भेट देऊन आयोजक संस्थेचे आणि संस्थेच्या अध्यक्ष सौ. संध्या तेरसे कौतुक केले.


रविवारी ५ नोव्हेंबर रोजी या महोत्सवाची सांगता झाली. यावेळी नाबार्डचे डॉ. अमेय देसाई, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी शरद चव्हाण, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, आरती पाटील, पप्या तवटे, रुपेश कानडे, सुनील बांदेकर, जगदीश चव्हाण, श्री. तळवडेकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. अमेय देसाई यांनी सर्व उद्योजक आणि आयोजक संस्थेचे कौतुक करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ. जान्हवी काराणे (मलमल पुरी), द्वितीय क्रमांक सौ. शुभांगी सौदागर (राघवदास लाडू), तृतीय क्रमांक सौ. सायली पुरोहित (अनारसे), नाविन्यपूर्ण पदार्थ म्हणून सौ. मधुरा धुरी (विड्याच्या पानाची कटोरी) याना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लकी ड्रॉ स्पर्धेचा निकाल सुद्धा जाहीर करून विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निकाल वाचन संस्थेच्या सचिव दीप्ती मोरे यांनी केले. यावेळी सौ. अक्षता कुडाळकर, सौ. योगिता कवठणकर तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!