साळेल ओहोळात आढळलेल्या मगरीला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले

साळेल वरचीवाडी येथील ओहळात येथील युवकांना साधारम पाच फूट लांबीची मगर दिसून आली होती. याबाबत युवकांनी या मगरीची माहिती गावातील इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वनविभागाचे वनरक्षक शरद कांबळे यांना बोलवून ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद करुन त्यांच्या ताब्यात दिली. रात्री उशीरा मगरीला उपवनसंरक्षक रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड,कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मगरीला पकडण्यासाठी सरपंच रविंद्र साळकर, रोशन गावडे, प्रशांत मिठबावकर, प्रकाश घाडी, चिन्मय तावडे, आबा घाडी, मंगेश जामदार, नंदू गावडे, संजय गावडे, साबाजी गावडे, लवकेश साळकर, प्रमोद जामदार, प्रकाश गावडे, गणेश गावडे, बाबू घाडी, कमलेश साळकर, निलेश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्यालगत असलेल्या गणेश विसर्जन होणाऱ्या तळीचा वहाळ येथे पाच फूटी भली मोठी मगर या वहाळाच्या पाण्यात आली कशी? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. याबाबत गावात दिवसभर चर्चा सुरु होती.मगर जलचर परीसंस्थेतील प्रमुख घटक असल्यामुळे 1972 च्या कायद्यान्वये संतक्षित केले आहे. असे वनविभागाचे श्रीकृष्ण परीट यांनी सांगितले.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!