नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करूळ हायस्कुल चे ज्युदो स्पर्धेत यश

प्रशालेच्या यशा बद्दल सर्वच स्तरातून होतेय कौतुक
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली, कोल्हापूर विभागीय ज्युदो स्पर्धेत करूळ हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मिरज – सांगली या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धामध्ये 14 वर्ष वयोगट मुली 36 किलो खाली कु. कृष्णाई नंदकिशोर रावराणे हीने प्रथम क्रमांक,17 वर्ष वयोगटात, मुली 40 किलो खाली कु. तन्वी संतोष पारकर प्रथम क्रमांक, प्राविण्य प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. यशस्वी विद्यार्थिनींना निलेश बुधाजी फोंडेकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. यशस्वी विद्यार्थी व क्रीडा शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष सदस्य , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
कणकवली /प्रतिनिधी