महाराष्ट्र राज्याचे गृह खाते फेल ठरत आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री पद काढून घ्यावे
खा. सुप्रिया सुळेंनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी पत्रकार परिषद वेळी केली मागणी
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जुमलेबाज
खा. सुप्रिया सुळेंचा प्रहार
महाराष्ट्र राज्यात कुठल्याही भागात गेल्यानंतर गृहमंत्रालयासंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. राज्यातील गृहमंत्रालय सर्व बाबतीत फेल ठरले आहे.त्यामुळे गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्री पद काढून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असताना पत्रकार परिषद वेळी सावंतवाडीत या ठिकाणी हॉटेल मँगो मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वेळीं केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत ,पक्ष निरीक्षक शेखर माने ,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे नेते विकास सावंत ,एडवोकेट दिलीप नर्वेकर, अर्चनाताई घारे -परब ,पुंडलिक दळवी ,रेवती राणे ,सायली दुभाषी, आदी उपस्थित होते. यावेळी, त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार प्रहार केला. हे सरकार जुमलेबाज सरकार असल्याची टीका त्यांनी केली . महागाई,बेरोजगारी यासारखे प्रश्न असताना हे सरकार ते सोडवताना दिसत नाही. असे सुळे म्हणाल्या . आगामी निवडणुका राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी म्हणून लढवणार आहोत. तर राज्यात महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष लढवणार आहेत. जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात येईल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई घारे परब यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे कार्यकर्ते अशी मागणी करू शकतात त्यांच्या मागणीचा सन्मान केला जाईल.
सावंतवाडी प्रतिनिधि