खारेपाटण-मणचे बस वेळेवर येत नसल्याने शाळकरी ,कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हाल

कुणकवण माजी उपसरपंच यांनी विभागीय नियंत्रकांशी संपर्क करून खारेपाटण-मणचे एसटी वेळेवर सोडण्याची केली मागणी
गेले काही दिवस झाले खारेपाटण -मणचे ही एस टि बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी पोंभुरले ,मणचे, कोर्ले,कुणकवण ,वायंगणी या गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सकाळी 6च्या बसने सर्व मुले कॉलेज मध्ये येत असतात.त्यामुळे कॉलेज सुटल्यावर या विद्यार्थ्यांना दुपारी 12:15 ची बस ही घरी जाण्यासाठी फार उपयुक्त आहे. या बस वर अनेक प्रवासी आणि खासकरून कॉलेज चे विद्यार्थी हे अवलंबून आहेत ,परंतु गेले काही दिवस ही बस वेळेच्या बाबतीत अनियमित होत असून खारेपाटण स्टॅन्ड येथून ही बस 12:15 वाजता येत नसल्याने कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत असून त्यांना या 12:15 च्या बस ची वाट बघत तात्काळत राहवे लागते.या सर्व घटनेची माहिती कुणकवन चे माजी उपसरपंच श्रीराम ठाकुरदेसाई यांनी विभागीय नियंत्रक यांना सांगून विद्यार्थ्यांचे हाल कमी करावे अशी मागणी केली तसेच 12:15 ची ही बस विद्यार्थ्यांची प्रवासाची संजीवनी असून खारेपाटण -मणचे ही बस वेळेवर सोडण्यात यावी अशी विनंती कुणकवण माजी उपसरपंच ठाकुरदेसाई यांनी केली आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





