झुंजार मित्रमंडळ नवरात्रोत्सवास मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी भेट देत विराजमान झालेल्या देवी चे घेतले दर्शन

खारेपाटण येथे दरवर्षी झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.या मंडळाच्या वतीने देवी ची प्रतिष्ठापना केली जाते .या झुंजार मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवसास खारेपाटण येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी भेट देऊन देवी मातेचे दर्शन घेतले.यावेळी या झुंजार मित्रमंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी रफिक नाईक यांचा सत्कार शाळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते महेश उर्फ गोट्या कोळसुलकर ,संतोष गाठे, गणेश लवेकर,गजानन राऊत,उपस्थित होते.रफिक नाईक यांनी देवीचे दर्शन घेतल्यामुळे सर्वधर्मसमभावाची भावना रुजायला मदत होणार असल्याची अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





