अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात राबवला उपक्रम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सुभाष उर्फ बाबू सावंत, इम्रान शेख, अमित केतकर, निशिकांत कडूलकर, सतीश पातडे आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





