सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे आज उद्घाटन

भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली यांनी दिली माहिती
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे उद्घाटन सावंतवाडी शहरातील गवळीतीठा येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज गुरुवार १९ ऑक्टोबर रोजीm सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुका विधानसभा मतदारसंघासाठी हे कार्यालय असेल. या कार्यालयातून थेट भाजपच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधला जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रथमेश तेली, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी, प्रतिनिधी